ETV Bharat / bharat

पिथोरागढमध्ये भूस्खलन, 2 जणांचा मृत्यू तर 5 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता - भूस्खलन

पिथोरागढच्या जुम्मा गावात भूस्खलन झाले असून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. यापूर्वीही आशा अनेक घटना घडल्या आहेत. उत्तराखंडवर अनेकदा नैसर्गिक संकट ओढावले आहेत.

2 killed, 5 buried under debris due to landslide in Uttarakhand
पिथोरागढ
author img

By

Published : Aug 30, 2021, 12:04 PM IST

डेहराडून - उत्तराखंडच्या पिथोरागढमध्ये भूस्खलन झाले असून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. ही घटना पिथोरागढच्या जुम्मा गावात घडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशन वेगाने करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी टि्वट करून दिली. तिथे फसलेल्या लोकांची सुटका व्हावी, यासाठी पार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.

2 killed, 5 buried under debris due to landslide in Uttarakhand
मुख्यमंत्र्याचे ट्विट...

दोन दिवसांपूर्वीदेखील येथे ढगफुटी झाली होती. त्यामुळे पूर आला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वीही आशा अनेक घटना घडल्या आहेत. उत्तराखंडवर अनेकदा नैसर्गिक संकट ओढावले आहेत.

हिमकडा कोसळल्यानं मोठं नैसर्गिक संकट -

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात गेल्या 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळून नदीला पूर आला होता. या नदीमार्गावर ऋषीगंगा आणि तपोवन या दोन ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. अनेक कामगार प्रकल्पाच्या बोगद्यासह विविध भागात काम करत असताना अचानक पुराचा लोंढा आला. यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही बोगद्यात अडकले. पुरात चिखल, दगड, माती मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने आपत्तीची भीषणता आणखी वाढली होती.

हेही वाचा - काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO : पुराचा लोंढा, अन् जीव वाचवण्याची धडपड

हेही वाचा - उत्तराखंड हिमस्खलन : १८ दिवसानंतरही बचावकार्य सुरुच, ७० मृतदेह सापडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.