गुवाहाटी आसाम हाय अलर्टवर असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांनी 15 ऑगस्टच्या पहाटे नागालँडच्या मोन जिल्ह्यातील जनरल एरिया न्यासा येथे शांतता भंग करण्याचा प्रतिबंधित गट NSCN KYA चा प्रयत्न हाणून पाडला. यामध्ये आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी झाले असून त्यांना जोरहाट आयएएफ रुग्णालयात हलवण्यात आले Attack On Assam Rifles Jawans आहे असे आसाम रायफल्सच्या अधिकृत सूत्रांनी Assam Rifles jawans injured सांगितले. attack by insurgent group in Nagaland
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आसाम रायफल्सच्या तुकड्या संवेदनशील भागांवर सतर्कतेने लक्ष ठेऊन आहेत. या भागात शांतता बिघडवण्याचा बंडखोर गटांचा कोणताही अनुचित प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आले आहे.
नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराज्य सीमेवर असलेल्या मोन जिल्ह्यातील न्यासा या सर्वसाधारण भागात UG कॅडरच्या हालचाली लक्षात आल्या. त्यानंतर आसाम रायफल्सच्या जवानांनी या भागावर वर्चस्व राखण्यासाठी असे अनेक हल्ले केले. आज 15 ऑगस्ट रोजी पहाटे अलर्ट स्काउट्सना झांखम ते न्यासा येणाऱ्या जंगल ट्रॅकवर UG च्या संशयास्पद हालचाली दिसल्या.
जवानांनी आव्हान दिल्यावर UGच्या बंडखोरांनी गोळीबार केला. त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याने UG गटाची मोठी हानी झाली. आसाम रायफल्सचे दोन जवानही यामध्ये जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जोरहाट एअरफोर्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा Eleven Terrorists Arrested आसाममध्ये अल कायदाशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक