ETV Bharat / bharat

Ukraine-Russia war : युक्रेन- रशिया युध्दात 596 जणांचा मृत्यू; आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने सांगितले आहे की युक्रेन जेव्हापासून युद्ध सुरू जाले आहे तेव्हापासून 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. (Ukraine-Russia war) तर यामध्ये1, 067 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका पत्रकाराचाही मृत्यू झाला आहे अशी माहितीही समोर आली आहे.

युक्रेन- रशिया युध्द (19 वा दिवस)
युक्रेन- रशिया युध्द (19 वा दिवस)
author img

By

Published : Mar 14, 2022, 10:07 AM IST

दिल्ली - युक्रेन रशिया युद्धाचा आजचा 19 वा दिवस आहे. (Russia Ukraine war) दरम्यान, आज पुन्हा एकदा युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये आज सोमवार दि. (14 मार्च)रोजी 10 :30 वाजता बोलणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून मत मांडले आहे. त्यामध्ये त्यांनी रसिया नाटोवरही हल्ला करू शकतो असा इशारा दिला आहे.

तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या हद्दीत

झेलेन्स्की म्हणाले, "मी चेतावणी दिली की प्रतिबंधक निर्बंधांशिवाय रशिया युद्ध सुरू करेल आणि मॉस्को नॉर्ड स्ट्रीम 2 एक शस्त्र म्हणून वापरेल. (American president Joe Biden)" युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, "मी पुन्हा सांगतो की जर तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही (फ्लाय झोन), तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या हद्दीत आदळण्यास वेळ लाणार नाही. असही ते म्हणाले आहेत.

युक्रेन युद्धाबाबत रशियाकडून खोट्या बातम्या प्रसारित

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे संभाषण व्हिडिओ लिंकद्वारे होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आज एका वरिष्ठ चिनी अधिकार्‍यांशी चर्चेसाठी रोममध्ये होते. युक्रेन युद्धाबाबत रशियाकडून प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या बातम्यांना चीनने प्रोत्साहन दिल्याबद्दल अमेरिकेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ते अमेरिकेला पाठवणार आहेत.

नाटो सदस्य पोलंडच्या सीमेपासून 25 किलोमीटर अंतरावर

रशियाने नाटो सदस्य पोलंडच्या युक्रेनच्या पश्चिम सीमेवर असलेल्या लष्करी प्रशिक्षण तळावर क्षेपणास्त्र टाकले आणि त्यात 35 जण ठार झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. नाटो सदस्य पोलंडच्या सीमेपासून 25 किलोमीटरहून कमी अंतरावर असलेल्या या विशाल लष्करी प्रशिक्षण क्षेत्रावर 30 हून अधिक क्षेपणास्त्रे टाकण्यात आली. युक्रेनियन सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी याचा वापर केला जातो. हे प्रशिक्षक अमेरिका आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO)देशांचे आहेत.

अचूक आकडा जास्त असू शकतो

पोलंड हा युक्रेनला पाश्चात्य लष्करी मदतीचा मार्ग आहे. रशियाने परदेशी शस्त्रास्त्रांच्या मालाला लक्ष्य करण्याच्या धमकीनंतर हा हल्ला झाला. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, दोन आठवड्यांपेक्षा जास्त रशियन हल्ल्यांमध्ये किमान 596 नागरिक मारले गेले आहेत. तथापि, या जागतिक संस्थेनुसार, अचूक आकडा जास्त असू शकतो. ल्विव्हचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी सांगितले की, रविवारी डागण्यात आलेली बहुतेक क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण प्रणालीने काम केल्यामुळे पाडण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यात 35 जण ठार तर 134 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी, कीव प्रदेशाच्या पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रशियन सैनिकांच्या गोळ्यांनी एका पत्रकाराचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Leadership Of Sonia Gandhi : काॅग्रेसच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वावरच विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.