ETV Bharat / bharat

माणुसकीचा अंत! अल्पवयीन मुलीवर 13 जणांचा सामूहिक बलात्कार

Gang Rape : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 13 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

Gang Rape
Gang Rape
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:31 PM IST

विशाखापट्टणम Gang Rape : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे समाजमन सुन्न करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 17 वर्षीय मुलीवर 13 जणांच्या दोन गटांनी सामूहिक बलात्कार केला.

11 आरोपींना अटक : पीडितेवर आधी तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारानं लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरबी बीचवर 11 आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे सर्व 11 आरोपी फोटोग्राफर आहेत. ही घटना 17 ते 19 डिसेंबर दरम्यान घडली. पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पीडितेला ओडिशातील तिच्या मूळ गावातून विशाखापट्टणम येथे आणण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमध्ये 11 आरोपींना अटक केली आहे असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.

पीडितेचा मूळ गावी जाऊन शोध घेतला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी फोर्थ टाउन पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. ही मुलगी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. तिचा मालक रजेवर गेला होता. ती घरात एकटी होती आणि मालकाच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत होती. पोलिसांनी मुलीचा ओडिशातील तिच्या मूळ गावी जाऊन शोध घेतला. ही मुलगी शॉकमध्ये असल्यानं तिला घडलेला प्रकार सांगण्यास थोडा वेळ लागला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

काय घडलं : पीडितेच्या बयानानुसार, ती 17 डिसेंबर रोजी प्रियकरासोबत विशाखापट्टनमच्या आरके बीचवर गेली होती. प्रियकर तेथे त्याच्या मित्राला सोबत घेऊन आला आणि दोघांनी एका लॉजमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्रस्त झालेल्या तरुणीनं आरके बीचवर जाऊन आपलं जीवन संपवायचा निर्णय घेतला. तेथे एका फोटोग्राफरनं तिला समुद्रकिनाऱ्यावर एकटं पाहिले आणि मदत करण्याची ऑफर दिली. तो तिला एका लॉजमध्ये घेऊन गेला, जिथे त्यानं त्याच्या साथीदारांसह तिच्यावर बलात्कार केला. तिचा दोन दिवस लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

महिला संघटनांनी घेतली दखल : यानंतर पीडित तरुणी या टोळीच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली. ती ओडिशातील कालाहांडी येथे तिच्या मूळ जिल्ह्यात गेली. आता आंध्र प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा वसिरेड्डी पद्मा यांनी विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त रविशंकर यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती मागितली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

हे वाचलंत का :

  1. IIT-BHU लैंगिक छळ प्रकरणी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना अटक; तिघांची हकालपट्टी
  2. लग्नाच्या बहाण्यानं मुंबईतील महिलेवर राजस्थानात सामूहिक बलात्कार
  3. कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.