ETV Bharat / bharat

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये चकमक; तब्बल 13 ठार - मणिपूर दहशतवादी दोन गटांमध्ये चकमक

Militants Two Groups Gunfight in Manipur : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीत 13 जण ठार झाले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.

militants
militants
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 5:55 PM IST

Updated : Dec 4, 2023, 6:34 PM IST

इंफाळ Militants Two Groups Gunfight in Manipur : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीत 13 जण ठार (Manipur Militants) झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सोमवारी दुपारी लेथू गावात घडली. म्यानमारला जात असलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटावर या भागात प्रबळ असलेल्या दुसर्‍या गटानं हल्ला (Militants Gunfight in Manipur) केला, अशी माहिती पहाडी जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यानं दिली. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षा दलाला 13 मृतदेह सापडले : या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना आतापर्यंत 13 मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु ते स्थानिक नसल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तेंगनौपाल जिल्ह्याची सीमा ही म्यानमारला लागलेली आहे.

दहशतवादी संघटनेचा शांतात करार : मणिपूरमध्ये कार्यरत असलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) या दहशतवादी संघटनेनं बुधवारी (29 नोव्हेंबर) सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. यासह या संघटनेनं हिंसाचार थांबवण्याचं मान्य केलं होतं. UNLF ही मणिपूरमध्ये कार्यरत असलेली सर्वात जुनी दहशतवादी संघटना होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील या संघटनेवर UAPA अंतर्गत पाच वर्षांची बंदी वाढवण्यात आली होती. या संघटनेनं शातंता करार केल्यान मणिपूरमधील संघर्ष कमी होणार असल्याची शक्यता आहे. या कराराच्या एका आठवड्यातच मणिपूरमध्ये दोन दहशतवादी संघटनांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - मणिपुरातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेनं हत्यारं टाकले, आतापर्यंतचा सर्वात मोठा शांतता करार

Last Updated : Dec 4, 2023, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.