ETV Bharat / bharat

World Crocodile Day : एकापाठोपाठ एक 125 सुसरीची पिल्ले अंड्यातून आली बाहेर! पाहा रोमांचक व्हिडिओ - सुसर

17 जून रोजी 'जागतिक क्रोकोडाइल दिन' आहे. या दिवशीच बिहारमधील बगहा येथून एक सुखद बातमी आली आहे. येथे 125 नवजात सुसरीच्या पिलांना सुरक्षितपणे गंडक नदीत सोडण्यात आले आहे.

Crocodile
मगरीचे पिल्ले
author img

By

Published : Jun 17, 2023, 7:59 PM IST

Updated : Jun 17, 2023, 8:28 PM IST

पहा व्हिडिओ

बगहा (बिहार) : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदीच्या काठावर 125 सुसरीचे पिल्ले अंड्यातून बाहेर आले आहेत. 2023 मध्ये येथे सुसरीची 9 घरटी सापडली होती. त्यातून 125 पिलांचा जन्म झाला होता. त्या सर्वांना सुरक्षितपणे गंडक नदीत सोडण्यात आले आहे.

World Crocodile Day
गंडक नदीच्या काठावर 125 सुसरीच्या पिलांचा जन्म.. पहिल्यांदाच घेत आहेत पाण्याचा आनंद

गंडक नदीत सुसरीची 125 पिल्ले सोडली : वन व पर्यावरण विभाग, वर्ल्ड वाइल्ड लाइफ ऑफ इंडिया आणि कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस प्राणीसंग्रहालयाच्या मदतीने 125 सुसरीच्या पिलांची गंडक नदीत सुरक्षित उबवणी करण्यात आली आहे. जागतिक वन्यजीव अधिकारी सुब्रत के बेहरा यांनी सांगितले की, गंडक नदीकाठी नऊ ठिकाणी सुसरीची अंडी सापडली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांचे संरक्षण करण्यात आले.

World Crocodile Day
वर्ल्ड वाईल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे अधिकारी सुसरीच्या पिल्लांसोबत

या सर्व नऊ ठिकाणी सापडलेली अंडी मच्छिमार आणि शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली होती. ज्यातून 125 सुसरीची पिल्ले जन्माला आली होती. त्यांना गंडक नदीत सुखरूप सोडण्यात आले आहे. वन्य प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी आणि मच्छीमारांनी खूप सहकार्य केले. - सुब्रत के बेहरा, अधिकारी, वर्ल्ड वाइल्ड लाइफ ऑफ इंडिया

सुसरींच्या संवर्धनाच्या मोहिमेला यश आले : गेल्या पाच - सहा वर्षांपासून वाइल्डलाइफ ट्रस्ट आणि वन व पर्यावरण विभाग सुसरींच्या संवर्धनाबाबत अत्यंत जागरूक झाले आहेत. दरवर्षी सुसरींच्या अंड्यांचे ठिकाण चिन्हांकित करून संरक्षित केले जाते. नंतर उबवणुकीचे काम केले जाते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने नवजात सुसरींच्या पिलांचा जन्म होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

World Crocodile Day
डायनासोरच्या प्रजातीतील आहेत सुसरी

गंडक नदीत सुसरींची संख्या वाढते आहे : सुसर हा डायनासोरच्या प्रजातीतील प्राणी आहे. त्या देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत गंडक नदीत त्यांची संख्या चांगली असणे ही आनंदाची बातमी आहे. 2016 मध्ये गंडक नदीत फक्त डझनभर भारतीय सुसरींच्या प्रजातींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता त्यांची संख्या 500 च्या आसपास पोहोचली आहे. त्यांची वाढती संख्या पाहता सरकारने त्यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सध्या संख्येच्या बाबतीत, चंबळ नदीनंतर गंडक नदीत सुसरींची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

हेही वाचा :

  1. world turtle day 2023 : जागतिक कासव दिन 2023; त्यानिमित्ताने टाकूया टर्टलच्या विविध प्रकारांवर एक नजर

Last Updated : Jun 17, 2023, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.