नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठे नाट्य घडले आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित ( 12 Rajya Sabha MPs suspended ) केले आहे. गैरवर्तणूक आणि नियमबाह्य वागणुकीमुळे ही कारवाई केल्याचे सभापती नायडू यांनी म्हटले आहे.
निलंबित झालेल्या खासदारांमध्ये सहा काँग्रेसचे ( 6 Congress MPs suspended ) खासदार आहेत. तर तृणमूल, शिवसेना, सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी दोन खासदार ( Shiv Sena MPs suspended ) निलंबित झाले आहेत.
हेही वाचा-Parliament's Winter Session : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी घेणार सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
हे खासदार झाले निलंबित
काँग्रेसच्या फुलो देवी नेतम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद हुस्सैन आणि अखिलेश सिंह यांचे निलंबन झाले आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, तृणमूलच्या डोला सेन, शांता छेत्री यांचे सभापतींनी निलंबन केले आहे.
हेही वाचा- Parliament Winter Session :कृषी कायदे मागे घेण्यास लोकसभेची मंजुरी, गदारोळातच निर्णय
सीपीएमचे एलामरम करीम आणि सीपीआयचे बिनोय विश्वम यांनाही निलंबनाला सामोरे जावे ( parliament winter session MPs suspension ) लागले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवरून सभागृहात घोषणाबाजी केली होती. राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.
हेही वाचा- Winter Session of Parliament : अखेर लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द, विरोधकांनी घातला गोंधळ
लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे (Farm laws rolled back) परत घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला ( The Farm Laws Repeal Bill ) लोकसभेत मंजूरी मिळाली. देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session of Parliament 2021) 29 नोव्हेंबर म्हणजेच सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. गोंधळातच तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले.