ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी आज होणार मेगा ऑक्शन; वाचा टॉप न्यूज - आज घडणाऱ्या घडामोडी

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

todays top news
todays top news
author img

By

Published : Feb 12, 2022, 6:36 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आयपीएलच्या 15व्या मोसमासाठी आज होणार मेगा ऑक्शन

आज आणि उद्या आयपीएलच्या 15व्या मोसमासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात 590 खेळाडूं उपलब्ध असणार आहे. सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक फ्रँचाईझी करणार आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उत्तराखंडमध्ये रॅली-

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तराखंडमध्ये रॅली करणार आहेत. आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस आहे.

  • आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युपीच्या कन्नोजमध्ये रॅली -

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्नोजमध्ये रॅली करणार आहेत.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा -

आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचा दौरा करणार आहेत. यावेळी ते येथे आयोजित एका कृषी प्रदर्शनीही भेट देतील.

PM नरेंद्र मोदी की यूपी के कन्नौज में रैली आज

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या शनिवारी पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ( Pune Municipal Corporation ) हल्ला झाला ( Kirit Somaiya Attack ) होता. त्यानंतर ते संचेती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. आठवडाभरानंतर किरीट सोमय्या यांनी पुण्यात पुन्हा दौरा आयोजित केला ( Kirit Somaiya Pune Visit ) होता. या पुणे दौऱ्याच्या निमित्त त्यांनी ईटीव्ही भारतसोबत खास बातचीत केली. त्यात त्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले ( Kirit Somaiya Serious Allegation On Uddhav Thackeray ) आहेत.

मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळं ( Dadar Shivaji Park ) बनविण्यास तसेच अंत्यसंस्कार न करण्यासंदर्भातील जनहित याचिका ( Shivaji Park PIL ) आज मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai Highcourt ) दाखल करण्यात आली आहे. येथील रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी अॅड. प्रकाश सालसिंगिकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन ( 12 BJP MLA Suspended ) रद्द करण्यात आल आहे. मात्र विधिमंडळाच्या अधिकार ( Powers of the Legislature ) आणि सर्वोच्च न्यायालयाचे ( Power Of Supreme Court ) अधिकार यांचा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून, सर्वोच्च न्यायालयातून मार्ग निघावा, यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, असे निवेदन देण्यात आले ( Statement of Speaker of the Legislature to the President ) आहे. 2019 च्या पावसाळी अधिवेशनात आक्षेपार्ह वर्तन केल्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. त्यामुळे विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप होतोय का? असा प्रश्न उभा राहिला होता.

पुणे - पुण्यात शुक्रवारी पुन्हा एकदा हायवोल्टेज ( Pune Kirit Somaiya Tour ) ड्रामा बघायला मिळाला. पुण्यात शुक्रवारी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं किरीट सोमैया यांच्या समर्थनात पालिका ( BJP Activists Gathered At PMC Campus ) कार्यालयाबाहेर जमले होते. पुणे पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमैया ( Kirit Somaiya Met With PMC commissioner ) यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ( kirit Somaiya Alligation On Uddhav Thackeray ) हल्लाबोल केला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त नसून, ते ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागत असल्याची टीका यावेळी सोमैया यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.