ETV Bharat / bharat

सेलिब्रेशन लोकशाहीचं, 112 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला - गुजरात स्थानिक निवडणूक न्यूज

गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या 112 वर्षांच्या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे. जामनगरमधील पीपीरटोडा गावातील रहिवासी सविरा बेन करमशीभाई वैष्णव या 112 वर्षीय आजीबाईंनी मतदान केले आहे.

सेलिब्रेशन लोकशाहीचं, 112 वर्षांच्या आजीबाई मतदानाचा हक्क बजावला

author img

By

Published : Feb 28, 2021, 5:40 PM IST

गांधीनगर - आज गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण लोकशाहीच्या या महासोहळ्यात सहभागी होऊन, आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या 112 वर्षांच्या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे.

जामनगरमधील पीपीरटोडा गावातील रहिवासी सविरा बेन करमशीभाई वैष्णव या 112 वर्षीय आजीबाईंनी मतदान केले आहे. काठीचा आधार घेत त्यांनी आज स्थानिक निवडणुकीसाठी मतदान केले. या वयातही त्यांनी मतदान केंद्रात येऊन मतदान केल्याने मतदान केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांनीही आजीबाईंचे कौतूक केले. मतदान न करणाऱ्यांसाठी आजींनी एक आगळावेगळा पायंडा घालून दिला आहे

गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान -

आज गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 81 महानगरपालिका, 31 जिल्हा पंचायती आणि 231 तालुका पंचायतीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली. 23 महानगरपालिका आणि 3 तालुका पंचायतीसाठी पोट निवडणुका होत आहे. 2 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. महापालिकेच्या 2729 जागांपैकी 95 ठिकाणी बिनविरोध झाल्याने आता 2625 जागांवर मतदान होणार आहे. जिल्हा पंचायतीच्या 955 जागा आणि तालुका पंचायतींच्या 4655 जागांसाठी मतदान सुरू आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.