आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- आज राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन दरबार हॉलचे उद्घाटन -
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 10 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. आज 11 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
- आज दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण -
आज सांयकाळी 4 वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
- आज अमित शहा यांची बरेलीत रॅली -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते अमित शहा शाहजहांपूर आणि बरेलीत रॅली करणार आहेत.
- आज कासगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कासगंज आणि बरेलीत रॅली करणार आहेत.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- VIDEO : 11 February Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- 11 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज व्यापार वृद्धी होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी
कालच्या महत्वाच्या बातम्या -
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ( Narendra Modi Speech in Goa campaign ) विविध मुद्द्यांना हात घालत गोवेकरांना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचासभेत पंतप्रधानांनी गोव्याला स्वातंत्र्याला लागलेला उशीर, काँग्रेसची सत्ता असताना गोव्याकडे झालेले दुर्लक्ष, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले काम आणि गोव्यात सुरू असलेल्या विकासकामे या मुद्द्यांवर भर दिला.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये हिजाब परिधान ( Karnataka Hijab Controversy ) करण्यावरून वाद सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटताना दिसून येत आहेत. हिजाब प्रकरणावर आज वरिष्ठ खंडपीठाने सुनावणी केली. दिवसभराची सुनावणी संपली असून आता याप्रकरणाची सुनावणी सोमवारी दुपारी होणार आहे. निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको. धार्मिक पोषाख टाळावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एकल खंडपीठाने हिजाब प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केले होते. आज या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठासमोर झाली. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुणे : कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत ( Hijab Protest In Pune ) आहेत. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँगेसने आज महात्मा फुले वाड्यात जोरदार आंदोलन केलं आहे. आम्हाला काय घालायचं किंवा आम्ही काय खायचं हे कोणी ठरवू शकत नाही. भाजपा सरकार मनमानी करत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यानी केला ( Muslim Woman Protest To Support Hijab Pune ) आहे. तर दुसरीकडे पुण्यातील हिंदू महासंघ मात्र या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पुण्यात आज एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हिजाबच्या समर्थनात आंदोलन केलं तर, दुसरीकडे हिंदू महासंघाच्या महिला कार्यकर्त्या हिजाबला विरोध करत रस्त्यावर उतरलेलया पाहायला ( Hindu Woman Protest To Oppose Hijab Pune ) मिळाल्या.
कोल्हापूर - आजवर आपण अनेक गॅरेज पाहिली असाल जिथे तुमची स्वतःची गाडी दुरुस्तीपासून सर्व्हिसिंगपर्यंत सगळी काम केली जातात. प्रत्येकवेळी आपण मेकॅनिक चांगला आहे, की नाही पाहत असतो आणि जर काम आवडले नाही तर त्या गॅरेजमध्ये पुन्हा पाऊल सुद्धा ठेवत नाही. मात्र, कोल्हापुरात असे एक गॅरेज आहे जिथे केवळ गतिमंद तसेच विकलांग मुले काम करतात. त्यांच्या कामाचा ग्राहकांकडूनही कौतुक केला जातो. नक्की काय आहे या मुलांची कहाणी? पाहा विशेष रिपोर्टमधून....