ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश विहीर दुर्घटना : ३० तासांनी बचावकार्य संपले; मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश - मदत

विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदा विहीर दुर्घटनेत एनडीआरएफ आणि एसएडीआरएफ टीमकडून ३० तास बचाव कार्य सुरू होते. यात विहिरीतून मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, १९ जणांना गुरूवारी सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

मध्य प्रदेश विहीर दुर्घटना : ३० तासांनंतर बचावकार्य संपले, मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

author img

By

Published : Jul 17, 2021, 12:37 AM IST

भोपाळ/विदिशा - मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदा येथे गुरूवारी सायंकाळी विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना विहिरीचा कठडा धसला. या घटनेत ४०हून अधिक जण विहिरीत कोसळले. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसएडीआरएफ टीमकडून ३० तास बचाव कार्य सुरू होते. यात विहिरीतून मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, १९ जणांना गुरूवारी उशिरा रात्री सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

नेमकी काय आहे घटना -

गुरूवारी सायंकाळच्या समारास रवी नावाचा मुलगा विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. रवीच्या वडिलांनी सांगितलं की, रवीची आई आजारी होती. त्यामुळे रवी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला. रवीसोबत पाणी आणण्यासाठी त्याचे वडिल देखील विहिरीवर गेले. रवीने पाण्याची बादली भरून वडिलांना दिली आणि त्यांना घरी पाठवले. दुसऱ्या भांड्यात पाणी भरत असताना रवीचा तोल जाऊन तो पाण्यात कोसळला. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यातील काही जण रवीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. पण रवीचा शोध त्यांना लागला नाही.

मोठ्या संख्येने नागरिकांनी त्या विहिरीजवळ गर्दी केली. तोपर्यत स्थानिक प्रशासन तिथे दाखल झालेले नव्हते. नागरिकच रवीचा शोध घेत होते. ही शोध मोहिम पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी विहिरीवर झाली होती. सर्वजण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून शोध मोहीम पाहत होते. तेव्हा विहिरीचा कठडा अचानक ढासळला आणि त्यावर उभे असलेले ४० हून अधिक जण विहिरीत कोसळले.

३० तास चालले बचावकार्य -

एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमकडून ३० तास बचावकार्य सुरू होते. यावेळी मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग आणि गोविंद सिंह राजपूत घटनास्थळी उपस्थित होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने गुरूवारी उशिरा रात्री १९ जणांना बाहेर काढले. त्यानंतरही शोधकार्य सुरू होते. यात मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मंत्री गोविंद सिंह यांनी बचाव कार्य पूर्ण झाल्याचे सांगत या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि यात दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितलं आहे.

बचाव कार्यात अडथळा -

विहिरीची रुंदी कमी असल्याने तसेच विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या. विहिरीतील पाणी काढण्यात बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या दरम्यान, तेथील जमीन अनेकवेळा धसली.

मध्य प्रदेश सरकारकडून मदत -

गंजबासौदा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शिवराजसिंह चौहान यांच्या मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काही मृतांच्या नातेवाईकांना ही मदत देखील तात्काळ देण्यात आली. तर या घटनेत जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

हेही वाचा - मुसळधार पावसाने घराचा खचला पाया; दोन मजली घर कलले!

हेही वाचा - VIDEO : हैदराबादेत काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.