ETV Bharat / bharat

डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात 10 लाख डॉक्टरांचे शुक्रवारी निषेध आंदोलन - June 18 protest

डॉक्टर हे सैन्य दलासारखे जनतेची सेवा करतात. ते घरी बसू शकतात, मात्र, त्यांनी या कठीण काळातही काम करण्याचा मार्ग निवडला. या एकविसाव्या शतकात, डॉक्टरांना टीकेच्या रूपात मानसिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

डॉक्टर दर्शवणार निषेध
डॉक्टर दर्शवणार निषेध
author img

By

Published : Jun 18, 2021, 12:29 PM IST

नवी दिल्ली - डॉक्टरांवर सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात केंद्रीय कायदा करण्याची मागणी करत भारतभरातील १० शाखांमधील १७०० आधुनिक वैद्य चिकित्सकांनी शुक्रवारी राष्ट्रीय निषेध दिन म्हणून साजरा करत आहे. “डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांवर वाढता शारीरिक हिंसाचार पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. आसाममधील तरुण डॉक्टरांवर झालेला हल्ला, पश्चिम बंगालमधील हुगळी येथील महिलांवर शारीरिक अत्याचार, तसेच कर्नाटक आणि अगदी ज्येष्ठ चिकित्सकावर झालेला अत्याचारही याचेच द्योतक आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. जे.ए. जलाल यांनी सांगितले की, 'दिवसेंदिवस असे घडत आहे, आयएमए सीआरपीसी आणि आयपीसीबरोबरच्या हिंसाचाराविरोधात केंद्रीय स्तरावर कायदे करण्यासाठी दबाव आणत आहे.

ते म्हणाले की, प्रस्तावित आरोग्य सेवा कर्मचारी आणि क्लिनिकल आस्थापना (हिंसा प्रतिबंध आणि मालमत्तेचे नुकसान) २०१९ विधेयकानुसार, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांवर मारहाण केल्यास त्यांना दहा वर्षापर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.

पीसीपीएनडीटी तसेच क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंट या नियमांमध्ये अनेक कायदे आहेत. सध्या २१ राज्यात याबाबत नियम आहेत. मात्र, केंद्रीय स्तरावर डॉक्टरांना संरक्षण देणारा एक कायदा असणे गरजेचे आहे. एका घटनेत, ११ वर्षांनतर एका डॉक्टरची डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र, आरोपीला शिक्षाच झाली नाही. कोरोनामुळे एपिडेमिक्स नियमात बदल करण्यात आाला. मात्र, गेल्या वर्षांत ३०० छोट्या घटनांची नोंद झाली आहे, असे डॉ. जयालाल सांगितले.

२०२० मध्ये ७५० डॉक्टरांचे निधन झाले. तर ७०० पेक्षाही जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेत जीव गमवावा लागला. डॉक्टर हे सैन्य दलासारखे जनतेची सेवा करतात. ते घरी बसू शकतात, मात्र, त्यांनी या कठीण काळातही काम करण्याचा मार्ग निवडला. या एकविसाव्या शतकात, डॉक्टरांना मानसिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

१८ जूनचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना सर्व स्थानिक शाखांचे डॉक्टर निवेदन देतील. हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व १७०० शाखा सहभागी होणार आहेत. सकाळी ९ वाजेपासून असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया, मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क, ज्युनियर डॉक्टर नेटवर्क यासारख्या सर्व संघटना या दिवसात सहभागी होत आहेत.

बिहार आणि केरळच्या मध्य भागात डॉक्टर सकाळी दवाखाने बंद करत निषेध नोंदवणार आहे. अशा प्रकारच्या हिंसाचार थांबविण्यासाठी प्रत्येक शाखेत समन्वय संघ स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच यात आपापसात संवाद होणेही गरजेचे आहे. डॉ. जयालाल यांनी सांगितले की, "प्रत्येक रुग्णालयात सुरक्षा तसेच रुग्णालयांना संरक्षित झोन म्हणून घोषित करण्यासाठी सरकारकडे आम्ही मागणी करत आहे.''

आयुर्वेद आणि बाबा रामदेव

रामदेव बाबांनी माफी मागितली असून आधुनिक औषधाच्या सेवांची कबुली दिली. आणि लस घेणार असल्याचेही सांगितले. आयएमए तसेच तेथील इतर शाखांनीही रामदेव बाबांनी लसीकरणासंदर्भांत केलेल्या विधानाबाबत तक्रार दाखल केली होती. कोरोनाची अ‍ॅलोपॅथिक आधुनिक औषधे, डॉक्टरांविरुध्द जी विधाने केली. ती देशातील नागरिकांच्या हिताच्या विरोधात आहेत. आम्ही आपल्या संस्कृतीचा आणि प्राचीन विज्ञानाचा एक भाग म्हणून आयुर्वेदाचा आदर करतो, पण आम्ही कधीच टीका करत नाही, असे डॉ.जयालाल यांनी सांगितले.

हेही वाचा - ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरींना यूपी पोलिसांनी बजावली नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.