ETV Bharat / bharat

Today Top News in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार; वाचा टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top News
Top News
author img

By

Published : Feb 1, 2022, 5:55 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२२ रोजी ( आज) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. कोरोना व्हायरसच्या काळात वाढणारी महागाई यामुळे सामान्य जनतेची लक्ष्य अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

  • राज्यात आजपासून कोरोना निर्बंधात शिथिलिता

राज्यात ओमायक्रॉन रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. शिवाय कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करत 50 % क्षमतेने नाट्यगृह, चित्रपटगृह व इतर ठिकाणे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

  • ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द ठरवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. पण आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या अहवालाच्या आधारे राज्यात ओबीसी आरक्षण सहित राज्य सरकार निवडणूक घेवू शकते. या निर्णयावर आज सुनावणी होणार आहे.

  • पिंपरी चिंचवडमधील पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील पहिली ते बारावी शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून ( आजपासून ) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिली ते आठवीपर्यंत अर्ध सत्रात आणि नववी ते बारावीचे वर्ग नियमित स्वरूपात सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • पुणे आणि नागपूर महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना आज जाहीर होणार असून त्यावरील अंतिम निर्णय हा 2 मार्चला होणार आहे. तर, नागपूर महापालिकेचे प्रभाग रचना ही निश्चित होण्याची शक्यता आहे.

  • भाजपाच्या उत्तराखंडमधील निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात

उत्तराखंडमधील भाजपाचा निवडणूक प्रचाराच्या अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी राज्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. भाजपाने रविवारी उत्तराखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती केली आहे.

  • मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे यांचा आज वाढदिवस

आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, इंग्रजी, गुजराती या भाषेत काम करणारे अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. शिवाय ते प्रचंड पर्यावरण प्रेमी आहे. ते सध्या 'सह्याद्री देवराई' या नावाने संस्था चालवित आहेत. ही संस्था झाडांच्या संवर्धनासाठी काम करते. यामुळे सयाजी शिंदेंना ओळखले जाते.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

01 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज धनलाभ संभवतो; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

कालच्या महत्वाच्या बातम्या -

कराड (सातारा) - कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय (Online Education Exam) घ्यावा लागला. उद्यापासून (मंगळवार) राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू (Colleges Reopen) करत आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant in Karad) यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 15 फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत. परंतु, त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आज राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले आहेत.

मुंबई- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील धारावी येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. हे अयोग्य असून मुलांनी मोर्चे काढू नयेत. चर्चेला यावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ( School Education Minister Varsha Gaikwad ) केले आहे.

अहमदाबाद - जिल्ह्यातील धंधुका गावात तरुण किशन भारवाडची मुस्लिम कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. हे प्रकरण आता उग्र बनत चालले आहे. अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, सुरतसह अनेक शहरांमध्ये मालधारी समाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचवेळी राजकोटमध्ये जमाव चिघळल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.

काँग्रेसला पहिला झटका आरपीएन सिंह ( RPN Singh ) यांनी दिला आहे. त्यांना पडरौना या परिसरात 'राजा साहेब' या नावाने ओळखले जाते. ते ओबीसी समाजातून येतात. तर याआधी जितिन प्रसाद ( Jitin Prasad ) कांग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले. योगी सरकारने त्यांना आपल्या कॅबिनेटमध्येही स्थान दिले होते. दोन्ही नेता काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे जवळचे मानले जात होते.

मुंबई - राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसऱ्या लाटेने ( Corona Third Wave ) डोकेवर काढल्याने निर्बंध अधिक कठोर केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यातील निर्बंध अधिक शिथिल ( Restrictions More Relaxed ) करण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार पर्यटन स्थळ, मैदाने, उद्याने, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, सिनेमागृह, नाट्यगृह आदी 50 टक्के ( Tourist spots, Grounds, Parks, Swimming Pools, Water Parks, Cinemas, Theaters etc. Will Be Opened at 50% capacity ) उपस्थितीत खुली करण्यास शासनाने संमती दिली आहे. मात्र लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्याची सूचना बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील नवे परिपत्रक रात्री उशिरा जाहीर करण्यात आले.

नवी दिल्ली - 2016 पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. मात्र 2017 पासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्याची सुरुवात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली (Former Finance Minister Arun Jately) यांनी केली होती. याआधी 1999 मध्ये अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी संध्याकाळी ऐवजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू केली होती. त्यापूर्वी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2017 पासूनच रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची परंपरा सोडण्यात आली होती, ती सर्वसाधारण अर्थसंकल्पातच विलीन करण्यात आली होती. 1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजी भाषेतच मांडला जात होता. त्यानंतर तो हिंदीतही सुरू झाला. 2020 मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण दिले. त्याला 2.40 तास लागले. 2020 पासूनच अर्थमंत्र्यांनी पेपरलेस बजेट सुरू केले. म्हणजेच त्यांनी टॅबलेटवर बजेट वाचले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.