विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात का घेतली भूमिका? - Lok Sabha election
Published : Mar 30, 2024, 10:46 PM IST
पुणे Lok Sabha election : बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी आता माघार घेतली असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय. गेल्या काही दिवसांपासून शिवतारे यांचा अजित पवारांना असलेला विरोध पाहता ही बंडखोरी पवारांमुळं झाली की त्यामागे आणखी कोणी होतं. याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडं शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. तर, दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार शैलेश काळे यांच्याशी 'ईटीव्ही' भारतनं संवाद साधला आहे.