सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार, ढोल-ताशाच्या गजरात काढली मिरवणूक; पाहा व्हिडिओ - गावातून काढली मिरवणूक
Published : Feb 11, 2024, 11:02 PM IST
बुलडाणा Buldana News : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या चिखली तालुक्यातील शेलसुर येथील सैनिकाचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं स्वागत केल आहे. ढोल ताशे आणि बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढत अनोख्या पद्धतीनं हा स्वागत समारंभ करण्यात आला. शेलसुर येथील सुदर्शन रामदास धंदर हे भारतीय सैन्य दलात 19 वर्षे सेवा करून नाईक पदावर निवृत्त झाले आहेत. 31 जानेवारीला ते पंजाब येथे सेवानिवृत्त झाले. रविवारी (11 फेब्रुवारी) ते त्यांच्या मूळ गावी शेलसुर येथे परतले. यावेळी गावकऱ्यांनी धंदर यांचे आगमन होताच फटाके फोडत जल्लोष केला. तसंच ढोल, ताशे आणि बँड पथकाच्या निनादात त्यांची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली आहे.