महाराष्ट्र

maharashtra

अंतरिम बजेट असल्यानं फार अपेक्षा नव्हत्या, विदर्भातील उद्योगजगतामधून प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 9:20 PM IST

Published : Feb 1, 2024, 9:20 PM IST

Updated : Feb 1, 2024, 10:33 PM IST

नागपूर Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडला आहे. (Reaction on Budget) निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला खुश करण्याची ही शेवटची संधी असल्यानं सामान्य नागरिकांसह प्रत्येक करदाता, उद्योगपती, शेतकरी आणि अर्थकारणासोबत संबंध असलेल्याचं लक्ष आजच्या बजेटकडे लागलेलं होतं. बजेटकडून सर्वच क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. उद्योग जगत आजच्या बजेटवर फार खुश नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. अंतरिम बजेट असल्यानं फार अपेक्षा नव्हत्या अस देखील ते म्हणाले आहेत.
लघु उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती: रिफ्रॉम, परफॉम आणि ट्रान्सफॉर्मवर केंद्र सरकार लक्ष देणार आहे. ऊर्जा, खनिज आणि सिमेंटचे कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. (Finance Minister Nirmala Sitharaman) छोटी शहरे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. त्याचा फायदा भविष्यात दिसेल असं मत काही उद्योजकांनी व्यक्त केलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही गटांगळ्या खात असताना भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या जीडीपीमध्ये वाढ झाली आहे. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती आली आहे.

Last Updated : Feb 1, 2024, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details