'लक्षद्विप बाबत घेतलेले निर्णय सर्व भारतीयांसाठी सुखद'; अर्थसंकल्पावर काय म्हणाले सीए चंद्रशेखर चितळे - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Published : Feb 1, 2024, 3:50 PM IST
पुणे Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर डायरेक्ट टॅक्स क्षेत्रातील तज्ञ सीए चंद्रशेखर चितळे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, "आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी जीडीपीची नवीन व्याख्या दिलीय. सरकारनं त्या दृष्टीनं पावलं देखील उचलली आहेत. आयएफएससीची मर्यादा आज वाढवण्यात आलीय. पर्यटन व्यवसायाला जे काही प्राधान्य दिलंय, ते देखील खूपच महत्त्वाचं आहे. लक्षद्विपचा विकास एक पर्यटन क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. हे महत्त्वाचं आहे." तसंच गेल्या काही दिवसांपासून मालदिवबाबत जे काही चाललंय ते पाहता लक्षद्विप बाबत घेतलेले निर्णय हे सर्व भारतीयांच्यासाठी सुखद होणार आहेत, असंही यावेळी चितळे म्हणाले.