बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांची बॅटिंग, पाहा व्हिडिओ - Sunetra Pawar Cricket video - SUNETRA PAWAR CRICKET VIDEO
Published : Apr 28, 2024, 10:38 PM IST
पुणे Sunetra Pawar Cricket video : राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात शरदचंद्र पवार विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज दत्तनगर, आंबेगाव परिसरात विविध सोसायट्यांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. लेक विस्टा सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांसमवेत सुनेत्रा पवार याही सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत वेळ काढून क्रिकेटचा आनंद लुटला. त्यांची फलंदाजी पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.