मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन पाहा LIVE - मराठा आरक्षण
Published : Feb 20, 2024, 11:22 AM IST
|Updated : Feb 20, 2024, 2:23 PM IST
मुंबई Maharashtra Special Session : मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारनं आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात झाली.
दहा टक्के आरक्षणाला मंजुरी : मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिलीय. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचेही म्हटले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. "मराठा आरक्षणाबाबत सरकारचा उरफटा कारभार आहे. सरकारला समन्वय साधून काम करायचं नाही. अभिभाषणानंतर गटनेत्यांची बैठक का? सरकार प्रथा, परंपरा मोडीत काढतंय. राज्य सरकार भांबवलेलं आहे. विशेष अधिवेशन बोलावून वेळकाढूपणा केला जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.