महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लोकसंख्येवर नियंत्रण हे सरकारचं नाही तर आपल्या सगळ्यांचं काम; गायक हरिहरन यांची स्पष्टोक्ती, शिर्डीत साईचरणी नतमस्तक - Singer Hariharan iyer - SINGER HARIHARAN IYER

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 8:32 PM IST

शिर्डी Singer Hariharan iyer : सुप्रसिद्ध गायक हरिहरन अय्यर यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर हरिहरन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी कलाकारांना स्ट्रगल करावं लागत होतं. मात्र, आता सोशल मीडियामुळं सगळं उपलब्ध झालं आहे. तर आता सोशल मीडियासोबत स्ट्रगल करावा लागणार आहे. तसंच देशात वाढत असलेली लोकसंख्या ही चिंतेचा विषय बनली आहे, असं हरिहरन अय्यर यांनी सांगितलं.


साईबाबांचे एक सुंदर भजन : सरकारने काही उपाय योजना करण्यापेक्षा आपण लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी साईबाबांचं एक भजन गायलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी साई मूर्ती आणि शाल देऊन हरिहरन यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details