हंगामातील पहिल्या हिमवृष्टीनं 'क्वीन ऑफ हिल्स' शिमला सजली! पाहा व्हिडिओ
Published : Feb 2, 2024, 12:24 PM IST
शिमला Shimla Snowfall : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी सुरू झाली आहे. गुरुवारी शिमला शहरात हलक्या पावसासह हिमवृष्टी झाली. यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. हिमवर्षाव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं शिमल्यात पोहोचले आहेत. काल शिमल्याच्या वरच्या भागात हिमवृष्टी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येनं शिमल्यात पोहोचले. त्यांनी या ताज्या हिमवृष्टीत भरपूर मस्ती केली. राजधानी शिमल्यासह, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. काल शिमला शहरात 2 इंचाहून अधिक बर्फ पडला. त्याचवेळी मुसळधार हिमवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्ते ठप्प झाले आहेत. रस्त्यावर भरपूर बर्फही साचला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीबाबत हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.