ETV Bharat / state

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा- रुपाली चाकणकर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्यात.

Rupali Chakankar
रुपाली चाकणकर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 2:08 PM IST

पुणे- राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याचं काही निश्चित होत नाहीये.अशातच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा असल्याचं सांगितलंय. 134 व्या महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथील महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

आज किंवा उद्या पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल : यावेळी रुपाली चाकणकर यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, राज्यातील सर्वच जनतेला उत्सुकता आहे की, महायुतीकडून कोण मुख्यमंत्री होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षाचे नेते आज दिल्लीला गेले असून, आज यावर चर्चा होणार आहे. आज किंवा उद्या पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होईल, असा मला विश्वास आहे. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला भरघोस यश दिलंय. आमची आताच नाही तर पहिल्यापासून आमची मागणी आहे की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्यात.

माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड: महिला मंत्रिपदाबाबत चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आताच माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालीय. त्यामुळे मी समाधानी असून, कोणाला कोणत मंत्रिपद देण्यात यावं यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं यावेळी चाकणकर म्हणाल्या. विरोधकांकडून ईव्हीएमबाबत आंदोलन केलं जातंय. याबाबत चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, विरोधक आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत हा प्रश्न लोकसभेच्या वेळी का नाही विचारला. आम्ही मोठे मन करून पराभव स्वीकारला होता. आम्ही पण लोकसभेनंतर ईव्हीएमबाबत आंदोलन करायला पाहिजे होतं, पण आम्ही मन मोठं ठेवून पराभव स्वीकारलाय, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्यात.

हेही वाचा-

  1. मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडल्याचे एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट संकेत, मोदी-शाह जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन
  2. दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.