"बुलढाण्याला प्रतापराव जाधवांच्या रूपानं तिसर्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळणार", संजय गायकवाड यांचा दावा - PRATAPRAO JADHAV News - PRATAPRAO JADHAV NEWS
Published : Jun 9, 2024, 1:41 PM IST
बुलढाणा Prataprao Jadhav News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असलं तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रीपद मिळणार आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं बोललं जात असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री पदाची भेट दिल्याचं जाहीर केलंय. ते म्हणाले की, " खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपानं 1997 नंतर या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास होईल. रेल्वे मार्ग, नदी जोड प्रकल्प आणि एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेनं प्रतापरावांना संधी दिली म्हणूनच त्यामुळं हे शक्य झालंय." आज सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल. यानंतर देशभरातील केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.