महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

‘धर्मवीर 2’वरुन रोहित पवारांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले, "निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट..." - Dharmaveer 2 - DHARMAVEER 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 1:33 PM IST

अहमदनगर Rohit Pawar On Dharmaveer 2 : 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील टीका केली आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रोहित पवार म्हणाले की, "निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार केला जात आहे. चित्रपट निर्माण करताना बऱ्याच गोष्टी या काल्पनिक असतात. जेव्हा आपल्याला गरिबांपर्यंत पोहोचता येत नाही, पक्षातील नेते केवळ भ्रष्टाचार करतात. तेव्हा त्यांच्याकडं शेवटचा मार्ग चित्रपट असतो. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते कुठंतरी कमी पडत आहेत. त्यामुळं हा फक्त निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट आहे, " असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details