वाडेश्वर कट्ट्यावर रंगल्या गप्पा...पहा काय म्हणाले रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे - Wadeshwar Katta
Published : May 15, 2024, 3:49 PM IST
पुणे Wadeshwar Katta : पुण्यासह राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात मतदान झालं. पुणे लोकसभा मतदार संघात एकूण 53.54 टक्के म्हणजेच 11 लाख 3 हजार 678 पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. असं असताना आज पुण्यातील 'वाडेश्वर कट्ट्यावर' (Wadeshwar Katta) पुणे लोकसभा मतदार संघातील तिन्ही उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) हे उपस्थित होते. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मात्र उपस्थित राहले नव्हते. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी शहरातील विविध पक्ष तसंच संघटनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या प्रश्नावर दिलखुलास उत्तरे देत, आम्हीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या निवडणुकीत माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत माझं घर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.