महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राणी लंकेंना 'तुतारी'चा 'AB' फॉर्म; 'या' दिवशी करणार उमेदवारी अर्ज दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पारनेर मतदारसंघातून (Parner Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या राणी लंके (Rani Lanke) यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. दरम्यान, गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी तब्बल चाळीस हजार महिलांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी दिली. 

महिलांच्या उन्नतीसाठी करणार प्रयत्न : महिला उमेदवाराला संधी मिळाल्यानं आनंद आहे. तसंच येणाऱ्या काळात महिलांना रोजगार कसा मिळेल आणि मतदारसंघासह महिलांच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करणार. तसंच पारनेर मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल यावर देखील लक्ष केंद्रीत करणार असल्याची प्रतिक्रिया राणी लंके यांनी दिली. 

ABOUT THE AUTHOR

...view details