तुरुंगात झाडू मारुन मुस्लिम कैद्यानं राम मंदिरासाठी जमविले 1100 रुपये, केंद्रीय मंत्री झाल्या भावुक - साध्वी निरंजन ज्योती
Published : Jan 22, 2024, 10:06 AM IST
|Updated : Jan 22, 2024, 2:42 PM IST
फतेहपूर Fatehpur jail prisoner Dedication : अयोध्येत आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा होणार आहे. याबाबत रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गानं यात योगदान देत आहे. फतेहपूर जिल्हा कारागृहातील कैद्यांनीही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी वाटण्यात येणाऱ्या प्रसादासाठी पिशव्या बनवून केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे सुपूर्द केल्या. झियाउल हसन या कैद्यानं तुरुंगात झाडू मारुन पैसे गोळा केले. यातून मिळालेला 1100 रुपयांचा धनादेश या कैद्यानं केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय मंत्री भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रामललाप्रती कैद्याचं असं समर्पण पाहून त्यांचे डोळे भरुन आले. तुरुंगात झाडू मारण्यासाठी हसनला दररोज 25 रुपये मजुरी मिळत असे. त्यानं सुमारे 45 दिवसांचं वेतन राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केलंय. जिल्हा कारागृहाव्यतिरिक्त संपूर्ण शहरात या कैद्याच्या कार्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही कैद्याचं कौतुक केलंय.