"तेव्हा बाबांनी प्रभू रामाची मूर्ती ह्रदयाजवळ ठेवली होती"; कारसेवकांची कन्या भावूक - अशोक सिंघल
Published : Jan 22, 2024, 11:32 AM IST
|Updated : Jan 22, 2024, 1:42 PM IST
पुणे Ram Mandir Pran Pratishtha : आज रामनगरी आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असून सर्वत्र दिवाळीप्रमाणं आनंद साजरा होतोय. पुण्यातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यापार्श्वभूमीवर आज सर्वत्र ज्यांनी ज्यांनी कारसेवा केली त्या सर्वांची प्रामुख्यानं आठवण होत आहे. पुण्यातील माधवराव जोशी यांनी त्यावेळी अयोध्या इथं प्रभू श्रीरामाची मूर्ती आपल्याकडे आपल्या हृदयाच्या जवळ सांभाळून ठेवली होती. एकूणच तेव्हाच्या आठवणींना त्यांची कन्या धरिद्री जोशी हिनं उजाळा दिलाय. यावेळी त्या भावूक होत म्हणाल्या, "माझे बाबा अशोक सिंघल यांच्या विश्वासातले होते. त्याच्याकडे अशोक सिंघल यांनी रामलल्लांची मूर्ती दिली होती. ती त्यांनी सहा तास आपल्या ह्रदयाच्या जवळ साभाळून ठेवली होती."