महागडे लॅपटॉपसह मोबाईल चोरणाऱ्या आंध्रातील दोन भावंडांना अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Pune Crime News - PUNE CRIME NEWS
Published : Jun 18, 2024, 9:51 AM IST
पुणे Pune Crime News: महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघा भावंडांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकानं अटक केलं. त्यांच्याकडून चार लॅपटॉप आणि सात महागडे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला. बाबू बोयर आणि सुरेश बोयर ही अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. ते आंध्रपदेशातील रहिवासी असून पुणे येथील लोणी काळभोर परिसरात वास्तव्यास आहेत. विश्रांतवाडी गुन्हे प्रतिबंधक पथकातील संजय बादरे, अक्षय चपटे आणि किशोर भुसारे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या घरातून १९ वेगवेगळ्या कंपनीचे महागडे लॅपटॉप, ६३ मोबाईल फोन, ५ डिजिटल घड्याळे असा एकूण ३१ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशी केली त्यांनी आणखी नऊ गुन्हे केल्याची माहिती समोर आली.