मुंबईत महिलांसाठी खास 'गुलाबी मतदान केंद्र'...पिंक बूथवर फक्त महिला कर्मचारी - Pink Polling Booth
Published : May 20, 2024, 6:31 PM IST
मुंबई Pink Polling Booth : मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागांवर आज मतदान पार पडलं. यावेळी नव मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. तर उत्तर मध्य मुंबईत देखील मतदान सुरळीत पार पडलं. वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी कॉन्व्हेंट या शाळेतील मतदान केंद्रात महिलांसाठी विशेष 'पिंक बूथ' (Pink Booth) सेंटर उभारण्यात आलं होतं. या पिंक बूथवर फक्त महिला कर्मचारी कर्तव्यावर असून महिलांसाठी खास हे बूध उभारण्यात आलं होतं. त्यामुळं या मतदान केंद्रावर वेगळं चित्र पाहायला मिळालं. सध्या या मतदान केंद्राची चांगलीच चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत मतदान : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 मतदारसंघांत आज मतदान पार पडलं.