महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शाह सभा घेणार, पण मंडप पुन्हा सुटल्याने नागरिकांची तारांबळ - Amit Shah Amaravati Meeting - AMIT SHAH AMARAVATI MEETING

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 4:20 PM IST

अमरावती Amit Shah Amaravati Meeting : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, सभेसाठीचा मंडप आज पुन्हा एकदा सुटल्यामुळे सभेसाठी आलेल्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली आहे.

महिलांनी हातात धरले मंडपाचे कापड : अमित शाह यांच्या सायन्स कोर येथील सभास्थळी वादळ आल्याने महिलांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या भागातील मंडपाचे छत पडले. यावेळी महिलांनी मंडपाचे छत धरले. तर काहींनी पुढे येऊन मंडप उभा करण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी देखील पडला होता मंडप : अमित शाह यांच्या सभेसाठी सोमवारपासून मोठा डोम आणि मंडप सायन्स मैदानावर टाकण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी वादळामुळे मैदानावरील संपूर्ण मंडप कोसळला होता. रात्री 10 वाजेपर्यंत मंडप कसाबसा उभारण्यात आला. आता अवघ्या काही वेळात अमित शाह सभास्थळी पोहोचणार असताना पुन्हा एकदा हा मंडप खाली पडला आहे. मंडप व्यवस्थापकांकडून मंडप पुन्हा उभा करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details