पंतप्रधान मोदी करणार रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचं ऑनलाइन उद्घाटन - Ruby Hall To Ramwadi Metro - RUBY HALL TO RAMWADI METRO
Published : Mar 5, 2024, 10:51 PM IST
|Updated : Apr 12, 2024, 3:19 PM IST
पुणे Ruby Hall To Ramwadi Metro : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकाच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ऑनलाइन होणार आहे. गेल्या काही दिवसात या मार्गाचं काम पूर्ण झालं होतं. तर बुधवार पासून हा मार्ग पुणेकरांसाठी खुला होणार आहे. वनाझ ते रामवाडी असा एकूण साडे सोहळा किलो मीटरचा हा मार्ग आहे. फक्त 30 रुपयात आणि विशेष म्हणजे 30 मिनिटात पुणेकरांना हा मार्ग पूर्ण करता येणार आहे. आज महामेट्रोच्या वतीनं नव्यानं सुरू होणाऱ्या मार्गावर रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक असा मेट्रो प्रवास ठेवण्यात आला होता. रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. वनाझ ते रामवाडी एकूण मार्ग हा साडे सोहळा किलो मीटरचा आहे. आता हा मार्ग बुधवार पासून पूर्णपणे सुरू होणार आहे.