ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्र आले; लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका - Laxman Hake On Jarange Patil
Published : Jun 24, 2024, 10:05 PM IST
जालना Laxman Hake On Jarange Patil : मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामुळं राज्यात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य केलंय. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरही टीका केली.
आम्ही आरक्षणासाठी एकत्र आले : आज जालना येथील मंठा चौफुलीवर मेडिसिटी हॉस्पिटल0 येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर घनाघाती टीका केली आहे. तसेच अनेक मुद्द्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. यावेळी बोलताना हाके म्हणाले की, ओबीसी नेते हे निवडणूक लढवण्यासाठी एकत्र आलेले नाहीत ते ओबीसीच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी आणि आरक्षणासाठी एकत्र आले आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसी नेत्यांनी तत्व पाळले. मात्र, तुम्ही एकत्र न येता ओबीसींचा आणि सर्व समाज बांधवांचा कार्यक्रम लावता हे चुकीच आहे, असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता टीका केली आहे.