Superfoods For Thyroid Patients : दिवसेंदिवस थायरॉइच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये थायरॉइचं प्रमाण जास्त आहे. गंभीर बाब म्हणजे अनेकांना आपल्याला थायरॉइड झालं आहे, याची देखील कल्पना नसते. वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे हे थायरॉइडची मुख्य लक्षणं आहेत. थाइरॉइडमुळे महिलांमध्ये पीसीओडीची समस्या, तणाव, चिंता, झोपमध्ये अडचण अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. थाइरॉइड ग्रंथी मानेच्या खालच्या भागात असतात. ही ग्रंथी आपल्या चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. बदलती जीवनशैली, अपुरे पोषण, आयोडीनची कमतरता, हार्मोनल असंतुलन यासारख्या कारणांमुळं थायरॉइड ग्रंथीमध्ये समस्या होवू शकते. थायरॉइड नियंत्रित ठेवण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. परंतु अनेकांना आराहात काय घ्यावं? याची कल्पना नसते. तुम्ही सुद्धा या गोंधळात आहात का? चला जर जाणून घेऊया थायरॉइड पेशंटनं काय खावं?
- बेरी : ब्लूबेरी रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरीसारख्या बेरी थायरॉइच्या समस्येसाठी उत्कृष्ट सुपरफूड आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अँटिऑक्सिडंट्स थायरॉईड ग्रंथींना ऑक्सिडेटिव्ह ताण आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय, बेरीमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजं आढळतात. यामुळं चयापचय सुधारते.
- नारळ : नारळ थायरॉइड पेशंटसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. नारळामध्ये असलेले मीडियम चेन ट्रॉयग्लिसराइड्स आणि मीडियम चेन फॅटी अॅसिडमुळे चयापचय सुरळीत होते. तसंच नारळ थायरॉइट नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे थायरॉइड असलेल्या सर्व व्यक्तींनी आपल्या आहारात नारळाचा समावेश करावा.
- हिरवे मुंग: हिरव्या मुंगामध्ये प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अॅंटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. तसंच यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असल्यामुळं पोटाच्या समस्या दूर होवू शकतात. बद्धकोष्टतेचा त्रास असलेल्यांसाठी हिरवे मुंग फायदेशीर आहेत.
- आवळा : आवळा व्हिटॅमिन ‘सी’नं समृद्ध आहे. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल पुरेशा प्रमाणात आढळतात. यामध्ये असलेले अॅंटीऑक्सिडंट्स आणि दाह विरोधी गुणधर्म थायरॉइड नियंत्रित करण्यासाठी फायेदशीर आहे. थायरॉइच्या रुग्णांसाठी हा एक सुपरफूड आहे. केसांच्या आरोग्यासाठी आवळा उपयुक्त आहे. यामुळे केस गळणे, कोंडा होणे यासारख्या समस्यांचं निराकरण होवू शकतं.
- भोपळ्याच्या बिया रामबाण : भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे थायरॉइडची समस्या असलेल्या लोकांनी भोपळ्याच्या बीयांचं सेवन करावं. तसंच भोपळ्याच्या बिया थायरॉइडचं संतुलन राखण्यास मदत करते.
संदर्भ
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा