चेन्नई : शिरूर भूस्खलनात बेपत्ता झालेल्या अर्जुनचा मृतदेह तब्बल 72 दिवसांनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय लष्कराचे निवृत्त मेजर जनरल इंदिरा पालन यांच्या नेतृत्वाखालील पथकानं शोधून काढला. दरम्यान, अर्जुन शोधण्यात आय-बीओडी तंत्रज्ञानानं कशी मदत झाली? याबाबत निवृत्त मेजर जनरल इंदिरा पालन यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.
प्रगत तंत्रज्ञानामुळं अर्जूनचा शोध : याबाबत निवृत्त मेजर जनरल इंदिरा पालन यांना सांगितलं की, 'कर्नाटकातील गंगावलीच्या किनाऱ्यावर बाभळीची लाकडं घेऊन केरळला परतणाऱ्या 30 वर्षीय अर्जुनसोबतच 13 जुलै रोजी अनेक लोक बेपत्ता झाले होते. त्याला सोधण्यासाठी 14 जुलै रोजी सुरू करण्यात आलेली शोध मोहीम मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरली होती. सेवानिवृत्त मेजर जनरल इंदिरा पालन यांच्या नेतृत्वाखालील एक पथक त्यांच्या शोधासाठी तैनात करण्यात आलं होतं. हे एक अवघड काम होतं. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळंच अर्जुन शोधनं शक्य झालं.
72 दिवसांनी अर्जुनचा मृतदेह सापडला : 'सुमारे 400 बाभळीचे लाकडं घेऊन जाणारा एक ट्रक कोसळून बेपत्ता झाला होता.खराब हवामानामुळं त्यातील मृतदेह सापडू शकले नाही. त्यानंतर माझ्या नेतृत्वाखालील टीमनं तिथं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला. सर्वसाधारणपणे, पाण्याखालील वस्तू शोधण्याचं तंत्रज्ञान भारताकडं नाही. मग आम्ही जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाचा वापर सिव्हिल इंजिनीअर्स एक मीटर खोलपर्यंत पाईप शोधण्यासाठी करतात. मृतदेह शोधण्यासाठी आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याला आय-बीओडी असंही म्हणतात. आय-बॉट तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रान्समीटर मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा, प्रोसेसिंग, डेटा विश्लेषण करून 72 दिवसांनी अर्जुनचा मृतदेह शोधण्यात आम्हाला यश आलं'.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर : 'अर्जुनचा मृतदेह शोधण्यासाठी i-bot ड्रोनला ट्रान्समीटर जोडून प्रथम गंगावली नदीच्या काठावर त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर, ड्रोननं ट्रान्समीटर आणि उपकरणांसह नदीच्या उड्डाण केलं. त्यानंतर, रेडिओ लहरींच्या सर्व माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. माहिती सोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला. असे अनेक टप्पे पार पडत शेवटी आम्ही लाकडं घेऊन जाणारा बेपत्ता ट्रकचा शोध घेतला. आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही चार ठिकाणे ओळखली. गोव्यातून आणलेल्या ड्रेझर वाहनानं त्यासाठी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर अर्जुनचा मृतदेह आणि ट्रकचं ठिकाण आम्हाला दिसलं. तब्बल 72 दिवसांनंतर अर्जूनचा शोध घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
अर्जुनचं काय झालं? : 14 जुलै 2024 रोजी कोझिकोड येथील अर्जुन हा टारुन बेलगवी उत्तर कर्नाटकातील अंगोला जवळील शिरूर येथे बाभळीची लाकडं घेऊन जात होता. वाटेत मुसळधार पवासामुळं दरड कोसळ्यानं तो बेपत्ता झाला. 19 जुलै रोजी, 20 रडारसह नौदल तसंच तांत्रिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. 20 जुलै रोजी अर्जुनसह 3 बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात ते अपयशी ठरले. 22 जुलैला जवळच असलेल्या गंगावली नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. खोल शोध डिटेक्टरसह केलेल्या शोधात नदीच्या काठावर कोणताही ट्रक गाडल्या गेल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. यानंतर आयपॉड प्रगत तंत्रज्ञानानं शोधमोहिम सुरू करण्यात आली.