माझ्या हत्येचा कट, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानं खळबळ
Published : Feb 3, 2024, 9:58 PM IST
ठाणे Jitendra Awhad : मला मारण्यासंदर्भात कट रचत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं 'मी' मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये गोलो होते. बैठक झाल्यानंतर 'मी' पत्रकारांशी संवाद साधत होतो. त्यावेळी तीन अनोळखी इसम पत्रकारांच्या पाठीमागे उभे होते. त्यांच्यात माझ्यावर हल्ला करण्याची चर्चा सुरू होती, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात बोलत होते. "मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. 'ती' एका पत्रकारानं ऐकली, अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलिसांना सांगून सावध केलं. मात्र, तेवढ्यात 'तो' हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये 19 व्या मजल्यावर कुठं तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, 'तो' त्यांच्या हाती लागला नाही", असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.