नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग - Fire At Chemical Company
Published : Feb 17, 2024, 5:44 PM IST
नवी मुंबई Fire At Chemical Company : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनं कंपनीजवळील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील सुजाण केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. जवळपास असणाऱ्या कलर कंपनीमध्येही आग पसरली आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली. या आगीमुळे एमआयडीसीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. अजून कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.