दुचाकीवरून रॅली काढणाऱ्या रामभक्तांवर गुन्हे, मुंब्रा पोलिसांची कारवाई - राम भक्तांवर गुन्हा दाखल
Published : Jan 24, 2024, 3:34 PM IST
ठाणे Case Against Ram Devotees: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त दुचाकीवर भगवे झेंडे फडकवत रॅली काढणाऱ्या आठ रामभक्तांवर मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली आहे. (Case against Ram devotees) पोलिसांनी या रामभक्तांवर मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून (Mumbra Police) त्यांच्या पाच दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. मुंब्रा पोलिसांच्या या कारवाईवरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांवरच कारवाईची मागणी जोर धरत आहे. (Ram Mandir Pranpratistha)
'या' पोलीस अधिकाऱ्याची कारवाई : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त रामभक्तांनी देशभरात दिवाळी साजरी केली. या अनुषंगाने संपूर्ण ठाणे शहरात देखील श्रीरामाचा जयजयकार करून मिरवणुका (Ram devotees rally) काढण्यात आल्या. मुंब्य्रातील एम. एम. व्हॅली, कब्रस्थान रोड येथे दुचाकीवर झेंडे फडकवत जय श्रीरामच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक काढणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील आठ युवकांवर मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अर्जुन जुवाटकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. (action against Ram devotees)
म्हणून झाली कारवाई : ही रॅली काढण्यासाठी मुंब्रा पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, असं मुंब्रा पोलिसांनी सांगितलं. गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं आहे. सर्व युवक 18 ते 25 वयोगटातील आहेत आणि जवळपास सर्वच विद्यार्थी आहेत.