महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कुर्ल्यातील हॉटेलला भीषण आग, आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक; पाहा व्हिडिओ - MUMBAI FIRE

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 10:00 AM IST

मुंबई : कुर्ला येथील एका हॉटेलला शनिवारी (11 जाने.) रात्री आग लागली. ही आग एवढी भीषण होती की हॉटेल आगीत पूर्णपणे जळून खाक झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी तसंच कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. पालिकेच्या माहितीनुसार, रात्री 9.05 वाजता एलबीएस मार्गावर असलेल्या रंगून झायका हॉटेलमध्ये आग लागली. या भागात आग लागल्याची माहिती एका स्थानिक व्यक्तीनं अग्निशमन विभागाला कळवली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीची भीषणता इतकी मोठी होती की, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आज रविवार पहाटे तीन वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर या घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती प्रशासनानं दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details