मुकेश अंबानी यांनी वाढले पाहुण्यांना जेवण, राधिका-अनंतच्या विवाहपूर्व विधींना सुरुवात - मुकेश अंबानी
Published : Feb 29, 2024, 5:24 PM IST
जामनगर ( गुजरात ) - Radhika Anants prewedding : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व विधींना सुरुवात झाली. हे विधी गुजराती संस्कृतीच्या परंपरेनुसार होत आहे. यासाठी दिवसांत सुमारे 51,000 स्थानिक रहिवाशांना अन्न वाटप केले जाणार आहे. लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने 'अन्न सेवा' आयोजित केली होती. जेवणावळी घालणे ही अंबानी कुटुंबाची जुनी परंपरा आहे. अंबानी कुटुंबाने पारंपारिकपणे शुभ कौटुंबिक प्रसंगी जेवण दिले. मुकेश अंबानी यांनी स्वतः अन्न वाढण्याचे काम केले. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीनेही वाढण्याचे काम केले. पाहुण्यांना भारतीय संस्कृतीच्या वैभवाचा आनंद घेता येणार आहे. पाहुण्यांना गुजरातमधील कच्छ आणि लालपूर येथील महिला कारागिरांनी बनवलेले पारंपरिक स्कार्फही देण्यात येणार आहेत.