रांची : बस्तर विभागातील कोंटा येथील भेज्जी भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. ओडिशामार्गे नक्षलवादी छत्तीसगडमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोंटा येथील भेज्जी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांना पकडण्याकरिता पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले, "सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीचे नक्षलवादी सदस्य आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून आम्ही डीआरजीची टीम शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आली. आज सकाळी भेज्जीच्या जंगलात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली." भेज्जी भागातील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदर या गावातील जंगल-टेकड्यांमध्ये डीआरजी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी सांगितलं. चकमकीत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या कारवाईत आयएनएसएएस( INSAS), एके- 47, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
अपने अदम्य साहस का परिचय देते हुए सुरक्षाबल के जवानों ने आज सुबह सुकमा जिले में नक्सलियों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए मुठभेड़ में 10 नक्सलियों को मार गिराया है।
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) November 22, 2024
जवानों को मिली यह सफलता सराहनीय है। नक्सलियों के खिलाफ हमारी सरकार जीरो टॉलरेंस की नीति पर कार्य करते हुए मजबूती…
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलता ठेवणाऱ्या धोरणावर कार्य करत आहे. बस्तरमध्ये विकास, शांतता आणि नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे". बस्तरमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे युग परत आल्याचाही मुख्यमंत्र्यांनी दावा केला.
आजपर्यंत छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या कारवाया-
- 16 नोव्हेंबर 2024: कांकेरमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा
- 4 ऑक्टोबर 2024: अबुझमद चकमकीत 38 नक्षलवादी ठार
- 3 सप्टेंबर 2024: दंतेवाडा येथे चकमकीत 9 माओवादी ठार
- 2 जुलै 2024: नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांचा खात्मा
- 15 जून 2024: अबुझमदमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार
- 7 जून 2024: नारायणपूरमध्ये चकमकीत 6 माओवाद्यांचा खात्मा
- 23 मे 2024: नारायणपूर-दंतेवाडा-विजापूर सीमेवर चकमकीत 8 नक्षलवादी ठार
- 10 मे 2024: पेडिया, विजापूर येथे चकमक, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
- 30 एप्रिल 2024: नारायणपूर-कांकेर सीमेवर चकमक, 9 नक्षलवाद्यांचा खात्मा
- 16 एप्रिल 2024: BSF-छत्तीसगड पोलिसांच्या पथकानं कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा
- 2 एप्रिल 2024: विजापूरमध्ये चकमक, 13 माओवादी ठार
- 27 मार्च 2024: बसागुडा, विजापूर येथे झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
- 27 फेब्रुवारी 2024: विजापूरमध्ये 4 माओवादी ठार
- 3 फेब्रुवारी 2024: नारायणपूरच्या ओरछा पोलिस स्टेशन परिसरात 2 माओवादी ठार
हेही वाचा-