महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबतचा खर्च नक्की जातो कुठं, मी अहवाल मागवून चौकशी करणार : खासदार अमोल कोल्हे - MP Amol Kolhe - MP AMOL KOLHE

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 10:01 PM IST

आळंदी (पिपंरी) MP Amol Kolhe : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडं प्रस्थान केलं. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पालखी सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान पहिला मुक्काम अजोळ वाड्यातून गेल्यानंतर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत गेल्या वर्षीसुद्धा शब्द दिला होता. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सुद्धा याबाबत पत्र लिहून संपूर्ण अहवाल मागवलेला आहे. शेकडो रुपये ज्या प्रकल्पावर खर्च केले आहेत, तो खर्च नक्की कशासाठी केलेला आहे. याबाबत संपूर्ण अहवाल मागवून चौकशी करणार आहे."


दूध भुकटी आयात शुल्क माफ करण्यावरुन टीका : सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारनं दूध भुकटी आयात शुल्क माफ करुन आयात करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय मागं घेण्याची केंद्र सरकारला उपरती येऊ दे, ही प्रार्थना करण्यासाठी आपण माऊलीकडं आलो, असं सांगत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर "राज्य सरकारवर वाढलेल्या कर्जाचा बोजा बघता सरकारनं वारकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा सरकार कशा पूर्ण करेल, याची आपल्याला काळजी वाटत आहे," असं सांगत, खासदार कोल्हे यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details