शिर्डी साईबाबांच्या मंदिर परिसरात एनएसजीचे 'मॉक ड्रिल', पाहा व्हिडिओ
Published : 4 hours ago
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दहशतवाद्यांचा हल्ला झाला, तर त्यावेळी काय करायचं? या पार्श्वभूमीवर बुधवारी (11 डिसेंबर) साईबाबांची शेजारती संपल्यावर रात्री 11:30 नंतर साईबाबा मंदिर परिसरात तसंच दर्शन रांगेत एनएसजी कमांडो पथकाच्या वतीनं तब्बल पाच तास मॉक ड्रिल करण्यात आलं. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सरावाच्या उद्देशानं प्रात्यक्षिक करण्यात आलं. मॉक ड्रीलमध्ये काही दहशतवाद्यांना शोधण्याचं काम एनएसजी कमांडोंनी केलं. इतकंच नाही तर दहशतवाद्यांनी जर कोणाला ओलीस ठेवले तर त्यांची सुटका कशी करण्यात येईल, याचंही प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं. काहींच्या अंगावर लावण्यात आलेली स्फोटकं यावेळी एनएसजीच्या बॉम्ब नाशक पथकानं निष्क्रिय केली. तसंच या परिसरात लपलेल्या काही दहशतवाद्यांवर कार्यवाई करण्याची कामगिरी फत्ते करण्यात आली.