असल्या भंगार लोकांवर बोलायचं नाही, मनोज जरांगे पाटील यांची बारस्कर महाराजांवर प्रतिक्रिया - मनोज जरांगे पाटील
Published : Feb 24, 2024, 10:39 PM IST
जालना Manoj Jarange On Ajay Barskar : मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अजय महाराज बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडून गेले आहेत. त्यांनी मनोज जरांगेंचा बुरखा टराटरा फाडू अशी धमकीही दिली आहे. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आता सगळं बाहेर पडणार असून अजय महाराज बारस्कर यांचा हिशेब व्यवस्थित होणार'' असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. अजय महाराज बारस्कर यांनी आज (24 फेब्रुवारी) पुन्हा पत्रकार परिषद घेत जरांगेंचे आरोप खोडून काढलेत आणि जरांगेंवर आणखीन आरोप केलेत. त्यावर प्रश्न विचारला असता ''असल्या भंगार लोकांवर मला बोलायचं नाही. त्यांच्यावर बोलायला मी मोकळा नाही. त्यांच्यावर बोलायला माझा समाज आहे,'' असं जरांगे म्हणाले. ''त्याचबरोबर त्याच्या इकडच्या माय माऊल्या येणार असून आता त्याचं सगळं बाहेर पडणार आहे. त्यांचा हिशेब व्यवस्थित होणार आहे,'' असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.