महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 10:51 PM IST

बीड Manoj Jarange Patil : मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मार्गदर्शन मेळावा 6 जुलै रोजी पासून चालू आहे. बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि मराठा आरक्षण मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत मराठा बांधवांमध्ये जनजागृती करत आहेत. तर सरकारला 13 जुलै पर्यंत वेळ दिला आहे. दिलेली वेळ आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यासाठी आज बीड शहरामध्ये शिवतीर्थ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय एकत्र आला होता. यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा समाचार घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details