महाराष्ट्रातील 10-20 जन सरकारची सुपारी घेऊन मराठा समाजाविरोधात बोलत आहेत - मनोज जरांगे पाटील
Published : Feb 5, 2024, 7:28 PM IST
जालना : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज (5 फेब्रुवारी) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मराठा समाजाविरोधात बोलण्यासाठी सरकारनं ठरवून दिलेल्या काही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. (Maratha reservation) यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, जे कोणी मराठा समाजाविरोधात आता कारस्थान रचत आहे त्यांनी ते थांबवावं. (conspiracy against Maratha) राज्यामध्ये जे 10-20 जण मराठा समाजाविरोधात काम करत आहेत, त्यांनीसुद्धा आता विरोध करणं थांबवावं; कारण ते सरकारची सुपारी घेऊन मराठा विरोधात बोलत असतात.
मराठ्यांच्या ओबीसी असल्याचा 57 लाख नोंदी : मी पत्रकार परिषद घेऊन ज्या पक्षाचे ते विरोधक आहेत, त्यांची नावं घेऊन राज्यासमोर मांडणार आहोत. तर काही मराठा समाजाचेसुद्धा नेते आहेत. त्यांना वाटतं की, श्रेय आम्ही घ्यावं. त्यामुळे ते मराठ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सगळ्यांनी थांबवावं. मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून 57 लाख नोंदी मराठ्यांच्या ओबीसी असल्याच्या मिळाल्या आहेत. जे 75 वर्षांपासून झाले नाही ते आता झाले आहे. त्यामुळे मराठा आंदोलन हे नक्कीच यशस्वी होणार असल्याचं मत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.