महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग; अनेक कर्मचारी जखमी, पाहा व्हिडिओ - Fire in Jalgaon MIDC - FIRE IN JALGAON MIDC

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 2:02 PM IST

जळगाव Fire in Jalgaon MIDC : शहरातील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत सुमारे 15 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ही आग इतकी भीषण होती की, परिसरात आगीचे मोठ मोठे लोट दिसत होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. तसंच निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details