महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापामुळं माझं मताधिक्य घटलं’, आमदार महेंद्र थोरवे यांची टीका - MAHENDRA THORVE

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 10:19 PM IST

रायगड (खालापूर) : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे आणि अदिती तटकरे यांच्यात शाब्दिक युद्ध दिसून येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका केली, ज्याला अदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर थोरवे यांनी देखील सुनील तटकरे यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, "तुमच्या बापाच्या पापामुळं माझं मताधिक्य घटलं आहे. मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. तुमचे जे काही आमदार निवडून आलेले आहे ते काठावर निवडून आलेले आहेत. मी 5700 मतांनी निवडून आलेलो आहे. महायुती असताना सुद्धा राष्ट्रवादीने जो काही अपक्ष उमेदवार दिला. अश्या पद्धतीने छुप्या पद्धतीनं मला पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला". खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे नागरी सत्कार प्रसंगी पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांनी ही टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details