महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबईत दीड तासापासून मतदार मतदानासाठी ताटकळले, नेमकं कारण काय? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 12:27 PM IST

मुंबई Mumbai Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (20 मे) पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात आज मतदानाचा शेवटचा टप्पा असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असून मुंबईमध्ये मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं बघायला मिळतय. मात्र, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये दालमिया कॉलेज, मालाड पश्चिम, येथील मतदान केंद्रावर नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतल्याचं समोर आलय. जवळपास दीड तासांपासून मतदार रांगेत उभे असून रांग पुढं सरकत नसल्यानं मतदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील या रांगेत उभ्या होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना त्या म्हणाल्या की, एकीकडं मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत असताना, दुसरीकडं मात्र मतदारांना मतदान करण्यासाठी तासंतास रांगेत उभं राहावं लागतंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details