शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - MAHARASHTRA CABINET EXPANSION
Published : 6 hours ago
जळगाव :जिल्ह्यात कुणाला मंत्रिपद मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. यात गिरीश महाजन यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार अशी देखील चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. आज शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ? : "जनतेचं प्रेम आणि पक्षाच्या विश्वासावर मी आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली. मला मंत्रिपद मिळालं नसतं तरी मला राग नव्हता. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे. याआधी अनेकांनी चौथ्यांदा शपथ घेतली असेल, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 33 वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत शपथ घेण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. परमेश्वराचे आणि जनतेचे आशीर्वाद आहेत. शिंदे साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, हा मी पूर्णपणे खरा करण्याचा प्रयत्न करणार" अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.